मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी कोण काय करत होतं; अजित पवारांनी सांगितलं निरीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी कोण काय करत होतं; अजित पवारांनी सांगितलं निरीक्षण

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी कोण काय करत होतं; अजित पवारांनी सांगितलं निरीक्षण

मुंबई : विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आभार मानत बराच वेळ भाषण केले. मुख्यमंत्र्यांच्या दिलखुलास भाषणावेळी शिंदेच्या बाजूचे सभागृहातील अनेक नेते कुजबुज करत होते. यावर विरोधी पक्ष नेते यांनी अतिशय बारीक नजर ठेवत यावेळी नेमकं कोण काय करत होते. याचा उल्लेख करत अजित पवारांनी (Ajit Pawar) भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील या सर्वांची फिरकी घेतली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंना आमदार म्हणून मी 2004 पासून या सभागृहात बघितले आहे. मात्र, 2004 ते 2022 पर्यंत आज झालेलं भाषण मी कधीच ऐकलं नव्हतं असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Vidhansabha News In Marathi )

हेही वाचा: चर्चेशिवाय एकही कायदा होऊ देणार नाही; विरोधीपक्षनेते अजित पवारांचा इशारा

अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे सभागृहात त्यांच भाषण खुलून करत होते. भाषणादरम्यान मी तुमच्या चेहऱ्यावरचं हावभाव बघत होतो. माझी खूप बारीक नजर असते. यावेळी उजव्या हाताला बसलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे माझं बारीक लक्ष होतं. ते सारखं आता बस झालं आता थांबा असं म्हणत होतं. मी जयंत पाटलांना (Jayant Patil) म्हटलं पण बघा फडणवीस काय म्हणत आहेत. पण मुख्यमंत्र्यांची गाडी अशी काही सुसाट सुटली जशी काय बुलेट ट्रेनच असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट लवकरच कमी करणार; शिंदेंची मोठी घोषणा

भाषणादरम्यान, समोरून टाळ्या पडत जातात आणि वक्ता मुद्यावरून भरकटत जातो. त्यामुळे फडणवीसांना शिंदेंच्या भाषणादरम्यान ते अधिकच काही बोलून जाऊ नये याची भीती होती. त्यामुळेच ते शिंदेंना आता बस झालं आता थांबा असे सांगत होते. एवढेच नव्हे तर, मागे बसलेल्या दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचादेखील शिंदे कधी भाषण थांबवतात यासाठी जीव खालीवर होत होता असे म्हणत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) नंतर काय ठरलं काल तो आमदार भेटायला आला सांगू नका असे सांगत होते. असे म्हणत आपलं सगळीकडे बारीक लक्ष असतं असे अजित पवार म्हणाले.

Web Title: Maharashtra Floor Test Ajit Pawar Vidhansabha Speech

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..