

मध्य पूर्वेतील युद्धाच्या झळा आता सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांसमोर यामुळे मान्सूनपूर्व शेतीची कामे करायची कशी असा प्रश्न उभा ठाकला आहे. राज्यातील ७५०० पैकी २ हजार पेट्रोल पंप बंद आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात महिनाभर पुरेल इतका साठा असल्याचं सांगितलंय. तरीही राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याचं आणि काही ठिकाणी रांगा लागल्याचं दिसतंय. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. राज्यात सर्वत्र आवश्यक तेवढं पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे. Petrol Pump Shutdown Sparks Concern In Maharashtra