
KYC Hurdle Blocks 746 Crore of Farmers Aid Despite Rule Cancellation
Esakal
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने १४१८ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. यापैकी आतापर्यंत ८२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला. दरम्यान उर्वरित निधी केवायसी न झाल्यानं अडकून पडला आहे. राज्य सरकारने केवायसीची गरज नसल्याचं जाहीर केलं आहे. तरीही तब्बल ७४६ कोटी रुपये बँकेत पडून आहेत.