
२०२७ मध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जाणार आहे. हा कुंभमेळा यशस्वी, सुरक्षित आणि भाविकांसाठी सोयीस्कर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (२२ जून) एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशिवाय राज्यमंत्री शिवेंद्रराजे भोसले, गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फदंडे, आमदार मंगेश चव्हाण आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.