

Leopard schedule 1 to schedule 2 proposal
ESakal
महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची १ मधून बिबट्यांना काढून टाकण्याचा आणि त्यांना अनुसूची २ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मानवी वस्तीत प्रवेश करणाऱ्या आणि लोकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्यांविरुद्ध स्वसंरक्षणासाठी कारवाई करण्याची कायदेशीर प्रक्रिया शिथिल केली जाऊ शकते.