maharashtra mantralay
sakal
Night life Maharashtra update : राज्यातील महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार असल्याने, ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे.
तर मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार हे २४ तास सुरू राहणार नाहीत. केवळ इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू राहतील. हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ हा अधिनियम सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटरे, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा व इतर आस्थापना यातील नोकरीच्या शर्तीचे आणि त्यात नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या इतर सेवा शर्तींचे विनियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रमध्ये लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थपना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनिय २०१७च्या कलम२(२)मध्ये दिवस याची व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणार चोवीस तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच सदर अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवती येतील. मात्र तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुटी देण्यात येईल, अशी तरतूद आहे.