
Uddhav Thackeray addressing media on heavy rainfall losses and farmer loan waiver, criticizing Mahayuti government policies.
Uddhav Thackeray addressing media on heavy rainfall losses and farmer loan waiver : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारपरिषद घेत, महायुती सरकारवर टीका केली.
दसरा मेळाव्याच्या आदल्यादिवशी होणाऱ्या या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्य्यांवरून सरकारवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ''आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट आहे. मागील आठवड्यात मी देखील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात जाऊन आलो, तेथील शेतकऱ्यांना भेटलो. मी तर प्रांजळपणे सरकारला विनंती सुद्धा केली, संकटात राजकारण न आणता आपण सगळे एकत्र होवून मार्ग काढता येईल का हे पाहू शकतो. परंतु मला नाही वाटत सरकारकडे काही अशी कल्पना आहे किंवा सरकारची तशी तयारीही दिसत नाही.''
''कारण, मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीत व्यस्त आहेत. दुसरे मुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावर सुद्धा स्वत:चे फोटो छापून वाटण्यात व्यस्त आहेत आणि तिसरे उपमुख्यमंत्री तर काही अंगाला लावूनच घेत नाहीत. म्हणजे कोणताही विषय आला तर त्यावेळी हे दुसरे उपमुख्यमंत्री कधीच दिसत नाहीत आणि जनता आता वाऱ्यावर पडलेली आहे.''
तसेच, ''मधल्याकाळात बातमी समोर आली आली होती, की काही साखर सम्राट हे भाजपमध्ये गेले आणि शेकडो करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडून थकहमी मिळवली. आम्ही जी मागणी करतोय ती या गरीब शेतकऱ्यांसाठी करतोय. ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहान टाकावी लागते. बैलजोडी तर कधीकधी पत्नीचं मंगळसूत्र देखील गहान टाकवं लागतं. कारण, काहीतरी गहान टाकल्याशिवाय त्याला कर्ज मिळत नाही. शेतकऱ्याच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही.
तसेच, आज परिस्थिती अशी आहे की, डोळ्यादेखीत त्यांचं पीक जमिनीसकट उध्वस्त झालेलं आहे. कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबून गेलेले आहेत. रोज शेतकरी आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. अशावेळी प्रश्न असा पडतोय की, जर का साखरसम्राट भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो, हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल, तर मग या सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा भाजपमध्ये येण्याची वाट हे सरकार बघतयत का? म्हणजे भाजपमध्ये आलात तर तुमचं कर्ज माफ करू, ही अत्यंत संतापजनक बाब आहे.'' असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
याशिवाय, मी शेतकऱ्यांशी बोललो तेव्हा काही शेतकरी उद्विग्न झालेले होते. आम्हाला आता आत्महत्येशिवया पर्याय नाही, असं ते सांगत होते. त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला व विनंती केली की असं कुणीही अताताईपणा करू नका. प्रति हेक्टर ५० हजार रुपये हे शेतकऱ्यांना तातडीने दिले गेले पाहीजे. कर्जमाफ झालं पाहीजे ही आम्ही मागणी केलेली आहे. आपल्याकडे अनेकदा शब्दांचा खेळ चालतो. मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला. तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता? ओला दुष्काळ ही संज्ञा नसेल, म्हणून तुम्ही झालेलं संकट नाकारू शकता का? काही वेळेस माणसाच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का? असा जाब उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.