

Maharashtra Tobacco Ban
ESakal
मुंबई : तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि प्रचार यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोटपा २००३ कायद्याची अंमलबजावणी आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत, राज्यातील तालुका-स्तरीय तंबाखू नियंत्रण समित्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाईल.