

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis's government announces a 20% expenditure reduction across departments amid drought concerns, while prioritizing essential welfare schemes and drought relief measures
esakal
महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खर्चकपातीचे धोरण जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना खर्चात २० टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, शिक्षण, आरोग्य, कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेसाठीच्या निधीत कपात केली जाणार नाही. रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.