शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच ; आजपासून फुटणार राजकीय फटाके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर लगेचच दिवाळी सुरू झज्याने सर्वच राजकीय पक्षातील नेते दिवाळीचे फटाके वाजवण्यात व्यस्त होते. मात्र आता दिवाळी संपल्याने सत्ता स्थापनेची स्पर्धा तसेच दावे-प्रतिदावे सुरू होणार असल्याने आजपासून राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीये.  

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर लगेचच दिवाळी सुरू झज्याने सर्वच राजकीय पक्षातील नेते दिवाळीचे फटाके वाजवण्यात व्यस्त होते. मात्र आता दिवाळी संपल्याने सत्ता स्थापनेची स्पर्धा तसेच दावे-प्रतिदावे सुरू होणार असल्याने आजपासून राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीये.  

विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 तारखेला लागल्यानंतर 25 तारखेपासून दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली.यामुळे शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळून देखील सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर गेला.निवडणूक निकालापासून शिवसेना-भाजप महायुतीची एकही बैठक झाली नसून सर्वकाही दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान दोन्ही पक्षात मुख्यमंत्री पदावरुन शीतयुद्ध मात्र सुरू झाले आहे. 

आणखी बातम्या वाचा : 

का केला मोदींनी शरद पवारांना फोन ? 

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार -सूत्रांची माहिती

राज्यात पुन्हा येणार युती सरकारचा 1995 पॅटर्न?

भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.यामुळे शिवसेनेने 50-50 फॉर्म्युला पुढे करत थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करत भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र 50-50 चा फॉर्म्युला ठरला नसल्याचे सांगत शिवसेनेच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला.यानंतर संतावलेल्या शिवसेनेच्या नेते संजय राऊत यांनी भाजववर टीका करण्याचा सपाटा सुरू केला.मात्र याचा भाजपवर फारकाही परिणार झाल्याच दिसत नाही. 

हरयाणामध्ये बहुमत नसतांना ही भाजपने सत्ता स्थापनेच्या दिशेने महत्वाची पावलं उचलली.महाराष्ट्रात मात्र महायुतीकडे बहुमत असतानाही ही सत्ता स्थापनेच्या हालचाली दिसत नाहीत.याउलट दोन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरून कुरघोडी सुरू झाल्या आहेत.भाजप-शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे सुरू असून आपणच वरचढ असल्याचे दाखवण्यात येत आहे.यामुळे दोन्ही पक्षातील वातावरण चांगलेच तापले आहे. 

मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात स्पर्धा सुरू झाली असून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना पाण्यात बघत आहेत.त्यातच शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 8 तारखेच्या आत सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले.याला उत्तर म्हणून शिवसेनेने भाजपसोबतची आपली बैठक रद्द करत भाजपला इशारा दिला आहे.यामुळे दोन्ही पक्षात कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे,त्यातच दिवाळी संपल्याने आजपासून आरोप-प्रत्यारोपाचे राजकीय फटाके फुटायला सुरवात झालीये असं म्हणता येईल. 

Web title : maharashtra government formation chaos detail updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra government formation chaos detail updates