

Maharashtra Fishing Ban
ESakal
महाराष्ट्र सरकारने सागरी मासेमारीवरील वार्षिक बंदीचा कालावधी १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून, आता ही बंदी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत लागू असेल. यापूर्वी ही बंदी १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीसाठी लागू होती. या नवीन निर्णयामुळे मासेमारी बंदीचा एकूण कालावधी ७६ दिवसांवर पोहोचला आहे. राज्यभरातील मच्छिमार आणि त्यांच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.