पुरग्रस्तांसाठी सरकारचा अजब अध्यादेश; करणार ऑनलाईन मदत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने आणखी एक अजब अध्यादेश काढला आहे. पूरग्रस्त नागरिकांना त्यांच्या बँक खात्यात मदत जमा करावी, असा आदेश सरकारने दिला आहे. सर्व बंद असताना लोक पैसे काढण्यासाठी बँका आणि एटीएमपर्यंत कसे पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने अजब जनादेश काढण्याची मालिका कायम ठेवली असून, आता पुरग्रस्तांना ऑनलाईन मदत करण्यात येईल असा अध्यादेश काढण्यात आला आहे. यावर टीका झाल्यानंतर काही रोख स्वरुपातही मदत करण्यात येईल, अशी सारवासारव करण्यात आली आहे.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने आणखी एक अजब अध्यादेश काढला आहे. पूरग्रस्त नागरिकांना त्यांच्या बँक खात्यात मदत जमा करावी, असा आदेश सरकारने दिला आहे. सर्व बंद असताना लोक पैसे काढण्यासाठी बँका आणि एटीएमपर्यंत कसे पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोल्हापूर, सांगलीतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मदत मिळण्यास उशीर होत असल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे. अशातच सरकारच्या नव्या आदेशामुळे पूरग्रस्तांचा संतापात भर पडणार आहे. या अध्यादेशाबाबत सरकारने सारवासारव केली आहे. आम्ही सगळी रक्कम खात्यात न देता काही रक्कम रोख स्वरूपात देणार आहोत, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे, हे प्रत्यक्ष मदतीनंतरच लक्षात येईल.

शुक्रवारी पुराचे पाणी दोन दिवस घरात असेल तरच मिळणार मदत, असा अजब अध्यादेश राज्य सरकारने याआधी काढला होता. सरकारच्या या निर्णयानंतर पूरग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आणि निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra government help to flood affected peoples through online