Maharashtra Govt Hikes Allowances for Election Duty Staff
esakal
निवडणूक काळात काम करणाऱ्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात आता राज्य सरकारने वाढ केली आहे. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील अध्यादेश प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांमध्ये काम करणाऱ्या सर्व राज्य अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या जाणाऱ्या मानधन, पारिश्रमिक, अतिकालिक भत्ता व निवडणूक भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.