बलात्काऱ्यांनो सावधान! महाराष्ट्र सरकार आणणार 'हा' कायदा

वृत्तसंस्था
Sunday, 15 December 2019

आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काऱ्यांना 21 दिवसांच्या आत शिक्षा देण्याचा प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारकडून याबाबत जानेवारी महिन्यात प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार जानेवारीत बलात्काऱ्यांसाठी आंध्र प्रदेशप्रमाणे कायदा आणण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आल्यानंतर देशभर संताप उठला होता. या प्रकरणानंतर आंध्र प्रदेश सरकारने 21 दिवसांच्या आत अशा प्रकरणांचा निकाल देण्यासाठी दिशा कायदा बनविला आहे. या कायद्यांतर्गत 21 दिवसांत बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यात येणार आहे. 

अमितभाई 'मातोश्री'वर जाणार होते; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काऱ्यांना 21 दिवसांच्या आत शिक्षा देण्याचा प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारकडून याबाबत जानेवारी महिन्यात प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे.

सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'

बलात्कार प्रकरणातील आरोपींचा तपास करुन 100 दिवसात त्यांना फाशी होईल, असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून सादर केला जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बलात्काऱ्यांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. या प्रस्तावाचा आराखडा तयार करून तो सरकारला सादर करण्याची भूमिका असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Government may be new law for rape criminal