Maharashtra Government Rewards World Cup Winners : महाराष्ट्र सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांना बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम!

Maharashtra Government Rewards World Cup Winners : विश्वविजेत्या टीम इंडियाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या सपोर्ट स्टाफलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठ्या रकमेचा धनादेश दिला.
Maharashtra Government felicitates World Cup winners Smriti Mandhana, Jemimah Rodrigues, and Radha Yadav with a significant cash reward for their outstanding contribution to Indian women’s cricket.

Maharashtra Government felicitates World Cup winners Smriti Mandhana, Jemimah Rodrigues, and Radha Yadav with a significant cash reward for their outstanding contribution to Indian women’s cricket.

esakal

Updated on

Smriti Mandhana, Jemimah Rodrigues, and Radha Yadav Honored by Maharashtra Government : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून संपूर्ण जगात देशाचा मान वाढवला आहे. या टीम इंडियावर आता सर्वचस्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. नुकतच या टीम इंडियाने दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. त्यानंतर आता या संघातील खेळाडून आपल्या शहरांमध्ये परतत आहेत, या ठिकाणी देखील या खेळाडूंचे जोरदार स्वागत होत आहे. या खेळाडूंवर केवळ कौतुकाचाच नाहीतर बक्षासांचाही वर्षाव सुरू आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(शुक्रवार) मुंबईत एका विशेष सत्कार समारंभात महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील तीन स्टार खेळाडू स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी तिन्ही खेळाडूंना सव्वादोन कोटी रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले आणि त्यांना महाराष्ट्राचा अभिमान म्हटले.

दक्षिण मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, जिथे फडणवीस म्हणाले की भारतीय संघाच्या विजयाने देशातील प्रत्येक तरुणीला खेळात रस घेण्यास आणि जागतिक स्तरावर चमकण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.

Maharashtra Government felicitates World Cup winners Smriti Mandhana, Jemimah Rodrigues, and Radha Yadav with a significant cash reward for their outstanding contribution to Indian women’s cricket.
Ajit Pawar discussion with Fadnavis : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण ; अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं काय म्हणाले?

याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस असंही म्हणाले की, जगाने पाहिले की हा विश्वचषक पहिल्यांदा जिंकला, जो आतापर्यंत  पारंपारिकपणे निवडक देशांकडे जात होता. याचबरोबर त्यांनी संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांना साडेबावीस लाख रुपयांचा धनादेश दिलाा, तर सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला ११ लाख रुपये मिळाले.

Maharashtra Government felicitates World Cup winners Smriti Mandhana, Jemimah Rodrigues, and Radha Yadav with a significant cash reward for their outstanding contribution to Indian women’s cricket.
Rahul Gandhi targets PM Modi : ''मोदीजी, तुमचे मौन बरेच काही सांगते, तुम्ही यासाठी गप्प आहात, कारण...''

याप्रसंगी विश्वविजेत्या संघाची उपकर्णधार स्मृती मानधना म्हणाली, "मुंबईत सन्मान मिळणे आमच्यासाठी खूप खास आहे. महाराष्ट्राने नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला आहे. २०१७ मध्ये आम्ही उपविजेतेपदापर्यंत पोहोचलो तेव्हाही राज्याने आमचा सन्मान केला होता. आमच्या कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट टीमशिवाय हा विजय शक्य झाला नसता."

तर प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले, "जेव्हा आम्ही मुंबईत आलो तेव्हा संघाला विश्वास होता की काहीतरी ऐतिहासिक घडेल. या खेळाडूंनी विश्वचषक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी दिवसरात्र काम केले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com