एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा कायम ; 20 हजार 130 कर्मचारी कर्तव्यावर हजर

ST Employee
ST Employeesakal media

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना (ST Bus Employee) घरभाडे भत्ता, महागाई भत्ता आणि वेतनवाढ लागू करून वेतनात एकूण सुमारे 7 हजारापर्यंत वाढ केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संपावर (St bus corporation strike) राहण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्यांना 5 हजाराची वेतनवाढ झाली ते सर्व एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर होण्यास तयार आहे. मात्र, अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल अधिकृत तोडगा (Authorized decision not taken) निघू शकला नाही.

गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या संपाचा तिढा अद्याप सुटत नसून, संप तरी कधी पर्यंत करायचा यावर संपकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत राज्यभरात एकूण 2477 बसेस धावल्या असून त्यामध्ये सर्वाधिक साध्या बसेसची 2045 संख्या होती. तर 20 हजार 130 एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. यामध्ये 2417 चालक तर 2223 वाचकांची संख्या असून, राज्यभरात एसटीचे विभागीय आणि प्रशासकीय कार्यालय सुरू झाले आहे.

राज्यात 135 आगार सुरू

एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून राज्यभरातील आगार सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार मंगळवारी 128 आगार सुरू झाले होते. तर बुधवारी 7 आगार पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे 250 पैकी सुमारे 135 आगार सुरू करण्यात महामंडळाच्या प्रशासनाला यश आले आहे.

तात्पुरती मेस्माची अमलबाजवणी स्थगित

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल ताठर भूमिका घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासंबंधीत बुधवारी कॅबिनेट बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, एसटी कर्मचारी स्वयंस्फूर्तीने कर्तव्यावर हजर होत असल्याने तात्पुरती मेस्माची अमलबाजवणी स्थगित केली असून, भविष्यात एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर होत नसल्यास मात्र, मेस्माची कठोर अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे.

प्रदेश - बंद आगार - चालू आगार - एकूण आगार

औरंगाबाद - 27 - 20 - 47

मुंबई - 13 - 32 - 45

नागपूर - 14 - 12 - 26

पुणे - 12 - 43 - 55

नाशिक - 27 - 17 - 44

अमरावती - 22 - 11 - 33

एकूण - 115 - 135 - 250

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com