Eknath Shinde
Eknath Shindeesakal

सरकारचं डेथ वॉरंट निघालं! येत्या १५ दिवसात सरकार कोसळणार; मविआच्या बड्या नेत्याचा दावा

Published on

ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटील यांना डिवचले आहे.गुलाबराव पाटीलांची 'गुलाबो गँग' असल्याचं सांगत त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.

Eknath Shinde
Amruta Fadanvis: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? अमृता फडणवीस म्हणाल्या, 'अजित पवारच...'

गुलाबराव पाटील यांनी कोरोना काळात कसा भ्रष्टाचार केला याची माहितीच संजय राऊत यांनी दिली. तसेच गुलाबराव पाटील यांच्या जलसंपदा खात्यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? ते काय भ्रष्टाचाऱ्यांची टोळी चालवत आहेत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Eknath Shinde
Pankaja Munde: "… मला महाराष्ट्राची काळजी वाटते आहे", पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

तर पुढे बोलताना त्यांनी सरकार कधी कोसळणार यांची भविष्यवाणी केली. राऊत म्हणाले की, प्रत्येक जण आपआपली भूमिका मांडत आहेत. आम्ही निकालाची वाट पाहतोय, पण सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं ४० लोकांचं राज्य आहे ते १५-२० दिवसांमध्ये गडगडल्या शिवाय राहणार नाही.

मी मागे देखील सांगितलं होतं फेब्रुवारी महिन्यात सरकार कोसळेल पण न्यायालयाचा निकाल उशिरा लागतो आहे. हे सरकार टीकत नाही या सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. आता फक्त सही कोणी आणि कधी करायची हे ठरलं आहे." अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषेदेत दिली.

दरम्यान आज जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे गटाची जाहीर सभा आहे. या सभेतून मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर बोलण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अनेक विविध प्रश्नांवर उद्धव ठाकरे, सरकारला धारेवर धरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com