Governor Acharya Devvrat
esakal
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. गीतेतील श्लोकाचा दाखला देत त्यांनी त्यांची तुलना दैवी अवताराशी केली आहे. “जेव्हा समाजाला एखाद्या महापुरुषांची गरज असते, त्यावेळी असे लोक देवलोकातून येतात. या लोकांमध्ये अशक्य कामं शक्य करण्याची शक्ती असते'', असं ते म्हणाले. राजभवनात आयोजित ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते.