Bhagat Singh Koshyari : मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? कोश्यारींच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची टीका

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyarisakal

अBhagat Singh Koshyari News : महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी होत होती. अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली आहे. यानंतर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, "राज्यपालांनी थोर महापुरुषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही."

"याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपाची भावना दिसते. महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? जाहीर निषेध!"

Bhagat Singh Koshyari
Ajit Pawar : 'त्यांना डायपर घातले पाहिजे...'; हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर अर्वाच्च भाषेत हल्ला

मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतः पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Bhagat Singh Koshyari
अनेकांचे अधुरे स्वप्न होणार पूर्ण; Yamaha RX100 चा आवाज पुन्हा घुमणार

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते यावेळी भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त होण्यची इच्छा पंतप्रधानांना सांगितली होती, माझा उर्वरित वेळ अध्ययन, मनन आणि चिंतन करण्यात घालवू इच्छीतो असे कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा देणार अशी चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून होती आता कोश्यारी यांनीच याला दुजोरा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com