Guardian Minister: शिंदे सरकारमध्ये फडणवीसच 'किंग'; तब्बल सहा जिल्ह्याचं पालकत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Guardian Minister: शिंदे सरकारमध्ये फडणवीसच 'किंग'; तब्बल सहा जिल्ह्याचं पालकत्व

मुंबई - Maharashtra Guardian Minister List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. (Devendra Fadnavis news in Marathi)

हेही वाचा: दसरा मेळाव्यात शिंदे पुत्राला मिळणार मोठी जबाबदारी? आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

दरम्यान शिंदे सरकारमध्ये गृहमंत्री आणि अर्थमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पालकमंत्रीपदाच्या बाबतीत सरकारमध्ये किंग असल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांचं पाकसमंत्रीपद देण्यात आलं असून यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

हेही वाचा: Mohan Bhagwat: आमच्या भूमीत हिटलर असूच शकत नाही, जर असला तरी...; भागवत यांचं विधान

मध्यंतरी देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र आज अखेर चंद्रकांत पाटील हेच पुण्याचे पालकमंत्री राहणार हे स्पष्ट झालं.

जिल्हानिहाय पालकमंत्री

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर, गोंदिया,

चंद्रकांत पाटील- पुणे

विजयकुमार गावित- नंदुरबार

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव,

दादा भुसे - नाशिक

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली

संदिपान भुमरे - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत - रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत - परभणी, उस्मानाबाद (धाराशिव),

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर - मुंबई शहर, कोल्हापूर

अतुल सावे - जालना, बीड

शंभूराज देसाई - सातारा, ठाणे

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर