esakal | २५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता येणार; 'हे' ११ जिल्हे मात्र कडक निर्बंधातच
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope

२५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता येणार; 'हे' ११ जिल्हे मात्र कडक निर्बंधातच

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक आज पार पडली. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊनच्या शिथिलीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने चर्चा करुन काही बाबींची शिफारस मुख्यमंत्र्याना केली आहे. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन-तीन दिवसांत घेतील.

काय आहेत शिफारसी?

पॉझीटीव्हीटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियमांत शिथिलता आणली जाणार आहे. यानुसार, २५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: पेगॅसस प्रकरण सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सची शाखा - शिवसेना

कसे असतील शिथिल केलेले निर्बंध?

  • दुकानं, हॉटेल्स, मंदिरे, जीम्स सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा

  • दुकाने शनिवारी सुद्धा चार वाजेपर्यंत चालू राहतील, रविवारी फक्त बंद राहिल

  • शॉप्स, हॉटेल्स, सिनेमा ५० टक्के क्षमतेने सुरु, याठिकाणी दोन डोस पूर्ण झालेले कर्मचारी हवेत

  • लग्न समारंभाबाबतच्या निर्णयातही थोडीफार शिथिलता येईल.

लोकलबाबतचा निर्णय

लोकल सुरु करण्याची मागणी होत आहे. दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरु करायची का याबाबत रेल्वे अथॉरिटीशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा: पेगॅसस बनवणाऱ्या कंपनीवर इस्रायल सरकारची छापेमारी

हे ११ जिल्हे तिसऱ्या गटातच राहणार

पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, अहमदनगर या जिल्ह्यात शिथिलता आणली जाणार नाही. या ठिकाणचे निर्बंध शिथिल होणार नाहीत. परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनाच्या सहकाऱ्याच्या मदतीतून आणखी कडक होतील. उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.

loading image
go to top