
Summary
1️⃣ महाराष्ट्रात १७ ते २१ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा, काही ठिकाणी रेड अलर्ट.
2️⃣ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता; मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस.
3️⃣ पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान व गावांचा संपर्क तुटला, नागरिकांना गरजेअभावी घराबाहेर न पडण्याचे आवाहन.
Maharashtra Rain Alert : राज्यभरात जोरदार पावसाचे पुनरागमन झाले आहे. शनिवारी रात्रीपासून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली दरम्यान हवामान विभागाकडून राज्यात १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन सतर्कता बाळगावे असे आवाहन करण्यात आले आहे.