थोडक्यात
कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज ॲलर्ट जारी, ४०-५० किमी/तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर तीव्र पाऊस, पूर्व विदर्भात २५-२६ जुलैला पूरस्थितीचा धोका.
मुंबईत २४-२७ जुलैदरम्यान मोठी भरती, २६ जुलैला ४.६७ मीटर उंचीच्या लाटांसह पाणी साचण्याची शक्यता.
Maharashtra weather Update: मुंबई, ठाण्यासह कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर रेड ॲलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज ॲलर्ट जाहीर करण्यात आला आहे.