
थोडक्यात
विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, भंडारा, चंद्रपूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, गडचिरोलीला रेड अलर्ट.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; पालघर, नाशिक, अमरावती, हिंगोली, नांदेडला येलो अलर्ट.
उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार, मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून सक्रिय.
Maharashtra Weather Update : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भात पावसाने थैमान घातले असून चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शाळा, कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.