राज्यात पुन्हा जोरदार सरींची शक्यता

राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून मॉन्सूनच्या पावसाची पुन्हा सुरवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Rain
Rainsakal
Summary

राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून मॉन्सूनच्या पावसाची पुन्हा सुरवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे - राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून मॉन्सूनच्या पावसाची पुन्हा सुरवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवारी (ता. ५) दक्षिण कोकण जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गेल्या दहा ते १२ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. सध्या मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा हा दक्षिणेकडे सरकला असून तो राजस्थान ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. तसेच राजस्थान व परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून वायव्य बंगालच्या उपसागरात येत्या रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची चिन्हे आहेत. यामुळे राज्यात पाऊस सक्रिय होताना दिसून येत आहे. राज्यात पुढील चार दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसेच किनारपट्टी लगत सोसाट्याचे वारे वाहतील, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात येत्या शनिवारपासून (ता. ६) पावसाचा जोर वाढू शकतो.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता. ५) सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. ५) पावसाचा येलो अलर्ट

रायगड, नंदूरबार धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

राज्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) -

नाशिक - २७

सातारा - १९

रत्नागिरी - ५

नागपूर - ४

औरंगाबाद, जळगाव - ३

पुढील चार दिवस येथे जोरदार सरींची शक्यता -

शुक्रवार (ता. ५) - रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, नगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, बुलडाणा, जालना, परभणी, वाशीम, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा

शनिवारी (ता. ६) - रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, पालघर, ठाणे, नाशिक, अकोला, बुलडाणा, परभणी, वाशीम, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा

रविवारी (ता. ७) - नाशिक, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया

सोमवार (ता. ८) - मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com