
Maharashtra Rain Updates: हवामान विभागाने राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्यात गेले आहेत. यामुळे प्रचंड वाहतूक कोडींही झाली आहे. सिंहगड रोडवर पाणी साचलं आहे.