Breaking : बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

HSC results will be announced on Thursday on 16 july
HSC results will be announced on Thursday on 16 july

बारावीचा निकाल गुरूवारी होणार जाहीर
- दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाइन निकाल पाहता येणार

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल गुरूवारी (ता. १६) जाहीर होणार आहे. निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी बारावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबली. त्यामुळे निकाल जुलैमध्ये जाहीर होईल, असे शिक्षण विभागाने सांगितले होते. त्याप्रमाणे हा निकाल जाहीर होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान घेण्यात आली होती. यावर्षी राज्यभरातून एकूण १५ लाख पाच हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात आठ लाख ४३ हजार ५५२ विद्यार्थी आणि सहा लाख ६१ हजार ३२५ विद्यार्थिंनी आहेत. परीक्षेसाठी नऊ हजार ९२३ कनिष्ठ महकाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी राज्यात एकूण तीन हजार ३६ परीक्षा केंद्रे होती.

निकाल येथे पाहता येईल :
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

 निकालाचा तपशील पुढीलप्रमाणे :
- ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसांपासून अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या "http://verification.mh-hsc.ac.in" संकेतस्थळावरुन स्वतः किंवा शाळा? कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
- गुणपडताळणीसाठी १७ ते २७ जुलै पर्यंत, तर छायाप्रतीसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार (ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल)
- उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येईल.
- बारावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध असतील


एफएमवर वाजतेय 'पाठशाला की घंटी'; ट्युन करा विद्यावाणी १०७.४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com