Health : दिवाळीच्या तोंडावर आरोग्य विभागाचा इशारा; संसर्गजन्य रोगांची टांगती तलवार

राज्यामध्ये स्वाईन फ्लूची वाढणारी रुग्णसंख्या हीदेखील गंभीर बाब आहे, असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
people are ill due to viral fever in nashik district
people are ill due to viral fever in nashik districtesakal

चीनमध्ये कोरोनाचा नवा अधिक घातक व्हेरिएंट पसरू लागला आहे. शिवाय युरोपातही हिवाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजार पसरू लागले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने इशारा दिला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क राहून काळजी घ्यावी लागणार आहे, असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

राज्यामध्ये स्वाईन फ्लूची वाढणारी रुग्णसंख्या हीदेखील गंभीर बाब आहे, असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. इन्फ्लुएन्झा, सारी, अशा श्वसनाच्या आजारांबाबतही आरोग्य विभागाने इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोणताही संसर्ग झाल्यास लोकांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि उपचार सुरू करावेत.

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे २०४ मृत्यू झाले आहेत, तर आत्तापर्यंत ३,५८२ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, तसंच सहव्याधी असणाऱ्या लोकांना आणि वृद्धांना अधिक धोका आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये स्वाईन फ्लूचे २,२७८ रुग्ण आढळून आले होते. याचं प्रमाण या वर्षी १० ऑक्टोबरपर्यंत ३,५८५ पर्यंत वाढली आहे. २०१९ मध्ये २४६ रुग्णांचे मृत्यू झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com