

Maharashtra Deputy CM Eknath Shinde addressing a press conference ahead of the state budget session, discussing the proposed increase in Ladki Bahin Yojana
esakal
Maharashtra Budget 2026 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी महायुती सरकारने पत्रकार परिषद घेऊन महत्वाच्या घोषणा केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आगामी अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेईल, असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या सन्मान निधीत वाढ करण्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडली.