

Summary
लाडकी बहिण योजनेवर सरकारने एका वर्षात ₹४३,०४५.०६ कोटी खर्च केले.
जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीत हा खर्च झाला.
लाभार्थींची संख्या एप्रिल २०२५ मध्ये २.४७ कोटींवर पोहोचली होती.
राज्यात लाडकी बहिण योजना सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. या योजनेमुळे राज्यातील इतर अनेक योजनांना कात्री लावण्याचा, निधी वळविण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र आता राज्य सरकारने या योजनेसाठी एका वर्षात तब्बल ४३,००० कोटी रुपये खर्च केले असल्याचे समोर आले आहे. जुलै २०२४ ते जून २०२५ पर्यंत ४३,०४५.०६ कोटी रुपये वाटप करण्यात आल्याचे वृत्त आहे. लाडकी बहिण योजनेची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर, आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरुन योजनेवरील वार्षिक खर्च उघड केला.