
Ladki Bahin Yojana Update: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी सुरु केलेली लाडकी बहिणी योजनेचा खर्च झेपत नसल्याचे समोर आले आहे. या योजनेसाठी 48 हजार कोटी रुपये लागणार असल्याने इतर अनेक योजना बंद करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. तसेच 30 टक्के सरकारी खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्याच्या एकूण वार्षिक तरतुदींच्या 70 टक्केच निधी खर्च करण्याच्या सूचना अर्थखात्याने विविध विभागांना दिल्या आहेत.