Ladki Bahin Yojana latest update 2026
esakal
Ladki Bahin Yojana October installment 2026 : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये जमा करण्यात आले. मात्र, दिवाळीपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये मिळतील, अशी अपेक्षा महिलांना होती. प्रत्यक्षात केवळ सप्टेंबरचा हप्ता जमा झाल्याने आता ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा वाढली आहे.