
महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत 26.3 लाख अपात्र महिलांना तब्बल 5100 कोटी रुपये वितरित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्येक पात्र महिलेने दरमहा 1500 रुपये मिळवण्याची ही योजना सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक यशाचे प्रमुख कारण ठरली. परंतु, नुकत्याच झालेल्या तपासणीत योजनेतील गंभीर अनियमितता उघड झाल्या असून, यामुळे योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.