Jaykumar Gore accident : या पूर्वी झालेल्या नेत्यांचे भीषण अपघात; क्षणात संपलं सारं

महाराष्ट्राचे अनेक मंत्री आणि आमदार यांना रात्री उशिराच्या प्रवासामुळे असे अनुभव आलेत कोण आहेत ते मंत्री...
Maharashtra leader who died in accident bjp Jaykumar Gore
Maharashtra leader who died in accident bjp Jaykumar GoreSakal
Updated on

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे साडेतीन वाजता अपघात झाला सुदैवाने गोरे या अपघातातून बचावले हा अपघात कसा झाला याबद्दलचे डिटेल्स अजून तरी समोर आलेले नाहीत पण महाराष्ट्राचे अनेक मंत्री आणि आमदार यांना रात्री उशिराच्या प्रवासामुळे असे अनुभव आलेत कोण आहेत ते मंत्री जाणून घेऊया या व्हिडिओ मार्फत,

तानाजी सावंत शिंदे गटात मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांचा सुद्धा 5 जून रोजी काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता यात सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र हा अपघात देखील रात्रीच्या वेळीच झाला होता आपल्या भूम परंडा या मतदारसंघातून ते पुण्याकडे निघाले होते त्यावेळी पुणे सोलापूर महामार्गावर वरवंड येथे हा अपघात झाला होता.

याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या गाडीला सुद्धा अपघात घडला होता संध्याकाळच्या वेळी अपघात घडला मुंबई पुणे महामार्गावरील उर्से टोलनाक्याजवळ ही घटना घडली यावेळी गाडीमध्ये राणे स्वतः नव्हतं. त्यांच्या पत्नी मुलं आणि काही नातेवाईक सुद्धा होते उर्से इथे गाडी टोल भरण्यासाठी थांबलेली असताना मागे असल्या ट्रकने राणे यांच्या गाडीला धडक दिली होती.

गोपीनाथ मुंडे भाजपचे वरिष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचेही अपघाती निधन झाले होते 2014 मध्ये केंद्रीय मंत्री झाल्यानंतरअगदी काहीच दिवसात मुंडे यांच्या गाडीला दिल्लीमध्ये अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले.

विनायक मेटे शिवसंग्राम चे संस्थापक आणि नेते विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन झाले मुंबई पुणे रस्त्यावर खोपोली नजीक झालेल्या अपघातात मेटे यांचा जागी मृत्यू झाला त्यांच्या अकस्मात मृत्यूने महाराष्ट्रात मोठी हळहळ व्यक्त झाली होती.

राज ठाकरे प्रत्यक्ष राज ठाकरे गाडीत बसलेले नव्हते मात्र राज ठाकरे यांनी मध्यंतरी औरंगाबाद मध्ये घेतलेल्या मोठ्या सभेच्या वेळी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या गाड्यांना एक सोडून दोन अपघात झाले पहिल्या अपघात हा नगर जवळ झाला आणि त्यानंतर औरंगाबाद जवळ ही दुसरा अपघात झाला पहिल्या अपघातात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या आणि दुसऱ्या अपघातात दहाहून अधिक तळ्यांचं मोठं नुकसान झालं होतं.

- नेहा सराफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

silver transporting vehicle Accident
Political Sparks Fly as Gore Targets MP Over Delhi Road Remarks
Jaykumar Gore clarifies his stance on Praniti Shinde, calling her like a sister despite political differences.
Minister Jaykumar Gore raises concerns over overnight statue installations; CM orders detailed study.
Marathi News Esakal
www.esakal.com