

New safety regulations for lifts and escalators implemented in the state
Sakal
राज्यातील रहिवासी इमारती, मॉल्स, रेल्वे स्थानके आणि व्यावसायिक संकुलांमधील लिफ्ट व एस्कलेटरच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने महाराष्ट्र लिफ्ट, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉक्स नियम, २०२६ अधिसूचित केले असून, १ नोव्हेंबर २०२६ पासून हे नवे नियम राज्यभरात लागू झाले आहेत. यातील नियम १०(१३) नुसार, आता १२ वर्षांखालील मुलांना कोणत्याही प्रौढ व्यक्तीच्या सोबतीशिवाय एकट्याने लिफ्ट, एस्कलेटर किंवा मूव्हिंग वॉक (सरकते पट्टे) वापरता येणार नाही.