दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

देशासह राज्यातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking News
Breaking News Sakal

सदानंद कदम यांना ED कडून अटक

सदानंद कदम यांना साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने १७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत सुनावली आहे.

गोरेगाव फिल्म सिटीला भिषण आग; अनेक कलाकार अडकले

गोरेगाव फिल्म सिटीला भिषण आग लागली आहे, या आगीत अनेक कलाकार अडकले असल्याची भिती वर्तवण्यात येत आहे.

किरीट सोमय्या हा दलाल; अनिल परबांचा गंभीर आरोप

मी किरीट सोमय्यांना बांधील नाही. किरीट सोमय्या हा दलाल आहे. असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला आहे. मी तपास यंत्रणांना बांधील आहे. किरीट सोमय्यांनी आजवर अनेक आरोप माझ्यावर केले. पण एकही आरोप ते सिद्ध करू शकलेले नाहीत. म्हाडाच्या बाबतीत त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप माझ्यावर केला होता. तिथेही म्हाडानं माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही असं लिहून दिलं होतं. या प्रकरणातही जेव्हा निकाल लागेल, तेव्हा किरीट सोमय्याला मी उत्तर देईन.

कोणाच्या सरकारमध्ये किती आत्महत्या? अजित पवारांनी दिली आकडेवारी

शेतकरी आत्महत्यांबाबत अजित पवार यांनी दिलेली आकडेवारी:

  • देवेंद्र फडणवीस (पाच वर्षात) - ५०६१

  • उद्धव ठाकरे - १६६०

  • एकनाथ शिंदे - १०२३

हसन मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

हसन मुश्रीफ प्रकरणी किरीट सोमय्या यांचा सबंध नसताना त्यांना FIR कशी मिळाली याची चौकशी होणार. उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे सत्र न्यायालय चौकशी करणार आहे.

भास्कर जाधवांंनी अध्यक्षांना लक्षात आणून दिली चूक

विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या कोणत्या बाजूने अध्यक्षांनी यावं, यावर भास्कर जाधवांनी मांडला मुद्दा. भर विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्षात आणून दिली चूक.

ई पास प्रकरणी चौकशी करुन त्वरित कारवाई व्हावी; अजित पवारांची मागणी

रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. जात विचारून खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. याप्रकरणी विधानसभेत विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं; आदित्य ठाकरेंचा सवाल

अर्थसंकल्पातून काहीही मिळालं नाही. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पातून काय मिळालं असा सवाल उपस्थि केला. तसेच सदानंद कदम यांच्यावरील कारवाई ही सुडाच्या भावनेने करण्यात आली.

दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेकडून शिवजयंतीचं आयोजन

दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेकडून शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राज ठाकरे यांच्याकडून अभिवादन. शिवाजी पार्कात मनसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ताब्यात घेतलं आहे.

'बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा', विरोधकांचे भोपळा घेऊन पायऱ्यांवर आंदोलन

बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजपची अधोगती सुरु

उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्रीपद कशामुळे गेलं हे सर्वांना माहिती आहे. शिवसेनेनं हिंदूत्व सोडलं नाही. जात आणि धर्मावर महाराष्ट्राच राजकारण कधीच आधारीत नव्हतं. असचं सुरु राहिलं तर जनता महाराष्ट्र धर्म दाखवेल, बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजपची अधोगती सुरु आहे.

चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी शी जिनपिंग, सलग तिसऱ्यांदा निवड

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. जिनपिंग यांची शुक्रवारी अधिकृतपणे चीनच्या पुढील राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. एका नेत्याची सलग तिसऱ्यांदा देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई-बेंगलोर हायवेवर वाहनांचा भीषण अपघात

राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई- बेंगलोर हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ३५ जण जखमी झाले आहेत. 

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का, चार वेळा आमदार राहिलेल्या पुत्तन्नांचा राजीनामा

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) तोंडावर राजकीय पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) गुरुवारी मोठा झटका बसला आहे. इथं भाजपकडून चार वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेले दिग्गज नेते पुत्तन्ना यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज 'शहर बंदची हाक'

औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर करण्यात आलं आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर शहरात मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे ही बंदची हाक दिली गेली आहे.

काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

तसेच, अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामीच, जुन्या योजनांचीच पुन्हा घोषणा, सरकारचा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. कांदा प्रश्नावरुन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कांदा प्रश्नाबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटिश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारवर हल्लाबोल केल्याचे उत्तर भारतीय जनता पार्टी संसदेत देणार आहे. राहुल गांधींनी दिलेल्या नोटिशीच्या उत्तरावर भाजप खा. शशिकांत दुबे यांना १० मार्चला संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर होण्यासाठी बोलावण्यात आले आहे. आज दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळतील.(Maharashtra live blog updates)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com