Marathi News Updates : दिवसभरातील राजकीय घडामोडी अन् इतर अपडेट्स एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Updates : दिवसभरातील राजकीय घडामोडी अन् इतर अपडेट्स एका क्लिकवर...

अतिक अहमद प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागवली 2017 पासूनची माहिती

अतिक अहमद हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 2017 पासून झालेल्या सर्व घडामोडींची माहिती मागवली आहे. उत्तर प्रदेशात मागील सहा वर्षांमध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडींची कोर्टाने माहिती मागवली.

मलिकांना जामीन मंजूर झाल्यानंतर शरद पवार गटाचा जल्लोष

नवाब मलिक यांना मेडिकल जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जल्लोष केला. पक्ष कार्यालयाबाहेर पेढे आणि फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाड हेसुद्धा जल्लोषात सामील झाले.

पुढील आठवड्यात राज्यात पावसाचा अंदाज

पुढील सात दिवसांमध्ये राज्यामध्ये पावसाचं पुनरागमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मलिकांना जामीन मंजूर होताच अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

नवाब मलिकांना जामीन मंजूर होताच अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. नवाब मलिक नेमकं कोणत्या गटाला पाठिंबा देतात, हे अस्पष्ट आहे.

नवाब मलिकांच्या कुटुंबाला अश्रू अनावर

जामिनानंतर नवाब मलिकांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत. मलिकांना जामीन मंजूर झाला असून दोन महिन्यांसाठी वैद्यकीय कारणास्तव ते तुरुंगाबाहेर असतील.

पंतप्रधानांनी मणिपूरवर बोललं तरी पाहिजे- राहुल गांधी

पंतप्रधान मणिपूरला जावू शकत नाहीत तर त्यांनी त्यावर बोललं तर पाहिजे. देशाची आर्मी दोन दिवसांमध्ये ही हिंसा थांबवू शकतात. परंतु त्यांना आदेश दिले जात नाहीत.

पंतप्रधानांना हे शोभलं नाही- राहुल गांधी

काल पंतप्रधान हसून हसून बोलत होते, हे त्यांना शोभत नव्हतं. मणिपूरमध्ये भयंकर घटना घडत असताना पंतप्रधान जोक करत होते, हे दुर्दैवी असल्याचं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरु आहे.

आपचे खासदार राघव चड्डा राज्यसभेतून निलंबित

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर खासदारांच्या खोट्या सह्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. खासदार राघव चड्ढा यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी राज्यसभेच्या ५ खासदारांनी केली होती.

पावसाळी अधिवेशन लोकसभा कामकाजाचे सूप वाजले!

पावसाळी अधिवेशन लोकसभा कामकाजाचे सूप वाजले. आज (११ ऑगस्ट) वंदे मातरम् वाजवून अधिवेशनाचा शेवट करण्यात आला. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, फडणवीसांना भेटणार

उपमुख्यमंत्री अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चेची शक्यता असून महायुतीत विविध जिल्ह्यातील ध्वजारोहणावरून वाद सुरू असल्याच्या चर्चेदरम्यान या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पवार व फडणवीस भेटीत हा तिढा सुटणार का ते पाहावे लागणार आहे.

विरोधकांच्या आघाडीला 'INDIA' नाव देण्यास विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली - विरोधी पक्षांची आघाडीला देण्यात आलेले नाव 'INDIA' याला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलच फटकारलं असून प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही याचिका दाखल केली असल्याचे निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवले. यापूर्वी दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने विरोधकांच्या आघाडीतील 26 पक्षांसह केंद्रला नोटीस पाठवली होती.

धुळ्यातील सांगवीत पोलिसांचा रुटमार्च; गावात तणापूरण शांतात परिस्थीत

धुळे जिल्ह्यातील सांगवी गावात आदिवासी दिनानिमीत्त लावण्यात आलेले बॅनर फाडल्याने दोन गटात दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. यावेळी तीन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. दरम्यान सांगवी गावात शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला.

थोड्याच वेळात अमित शाह लोकसभेत CRPC दुरुस्ती विधेयक मांडणार

नवी दिल्ली - आज 12 वाजता केद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत CRPC दुरुस्ती विधेयक मांडणार आहेत. या विधेयकामुळे ब्रिटिशांच्या जुन्या कायद्यांमध्ये बदल होणार आहेत.

हे विधेयक अतिशय तपशीलवार प्रक्रियेतून तयार करण्यात आले आहे, हे विधेयक आणण्यासाठी चार वर्षांपासून तयारी सुरू होती. तसेच अनेक तज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृह विभागाची बैठक

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृह विभागाची बैठक होणार आहे. राज्याचे

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक होणार आहे. दर १५ दिवसांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातो. दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आजची बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे. पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री दाखल होताच बैठक सुरु होणार

मुंबईत 1 लाख 286 मॅनहोल्स; महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबईत 1 लाख 286 मॅनहोल्स आहेत. तसेच सर्व गटारं पुढील मे महिन्यापर्यंत बंद करू अशी मागिती मुंबई महापालिकेकडून हायकोर्टात देण्यात आली आहे. मॉन्सून दरम्यान उघड्या मॅनहोल्सचं काम करणं शक्य नाही. असे देखील मुंबई महापालिकेतर्फे हायकोर्टात सांगण्यात आले.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे स्वतः कोर्टाला माहिती देत आहेत. रस्ते दुरूस्तीसाठी कोल्ड मिक्स, रॅपिड फिलिंग आणि इतर सर्व अद्ययावत तंत्रज्ञान आम्ही तातडीचा उपाय म्हणून वापर करत आहोत. याचिकाकर्त्यांनी आमच्यासोबत जाऊन पहाणी करावी असं ही चहाल कोर्टात म्हणाले.

MMR रिजनमधील सगळे महापालिका प्रशासक, आयुक्त मुंबई हायकोर्टात दाखल

MMR रिजन मधील सगळे महापालिका प्रशासक आणि आयुक्त मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले असून रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सहा महापालिका आयुक्तांना समन्स बजावले होते.

बीएमसी आयुक्तांसह कल्याण डोंबिवली , मीरा भयंदर , वसई विरार , नवी मुंबई आणि ठाणे महापालिका आयुक्त हजर आहेत.

एमएमआरडीएच्या सचिवांना यासुद्धा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. मुंबईसह आसपासच्या परिसरातील रस्त्यांवरचे खड्डे आणि उघडी मॅनहोल्स यासंदर्भात रूजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने आयुक्तांना समन्स बजावले होते. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सना खान हत्येप्रकरणी नागपूर येथे गुन्हा दाखल

नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान मृत्यू प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आगे. नागपूरमध्ये पप्पू शाहू यांच्या विरोधात अपहरणाचा गुम्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलिस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याचा आरोप झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूनीसा खान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याच्या तपासासाठी नागपूर पोलिसांनी पथकं देखील रवाना करम्यात आली आहे

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी एडलवाईज कंपनीच्या प्रतिनिधींची आज पुन्हा चौकशी

ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी एडलवाईज फायनान्स कंपनीला नोटीस पाठवली होती. कर्ज वसुलीसाठी कंपनीकडून दबाव टाकला जात होता असं नितीन देसाई यांनी ऑडिओ क्लिप मध्ये म्हटलं होतं. देसाई यांच्या आत्महत्येनंतर देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून रायगड पोलिसांनी एडलवाईज कंपनीच्या 5 प्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला आहे.

या अनुषंगाने खालापूर पोलिसांनी मंगळवारी कंपनीच्या 4 प्रतिनिधींची 8 तास चौकशी केली होती. मात्र या प्रतिनिधींनी अपुरे कागदपत्र सादर केले आणि माहिती अपूर्ण दिल्याने खालापूर पोलिसांनी आज पुन्हा कंपनीच्या प्रतिनिधींना हजर राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान खालापूर पोलिसांनी दाखल केलेला एआयआर रद्द करावा म्हणून एडलवाईसचे पदाधिकारी रेशेश शहा आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर आज न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे आणि न्यायमूर्ती आरएन लड्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

निर्मला सीतारामन आज लोकसभेत मांडणार जीएसटी सुधारणा विधेयक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2023 लोकसभेत चर्चा आणि पास करण्यासाठी मांडणार आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com