Marathi News: जरांगेची तब्येत बिघडली ते MPला मिळाले नवे CM; दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
sakal breaking
sakal breakingEsakal

शरद पवार मंगळवारी घेणार उद्धव ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार हे उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेणार आहेत. हॉटेल प्राईडमध्ये ठाकरे-पवार यांची भेट होईल. आगामी लोकसभा निवडणुका यासह इतर काही मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली; रुग्णालयात उपचार सुरु

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्राम करण्याचा सल्ला दिला आहे.

जरांगे पाटलांची सभा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नांदेडच्या मुदखेड येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री दहानंतर सभा सुरुच ठेवल्याने १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा सिक्किममध्ये दाखल

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा सिक्किममध्ये आले आहेत. ते गंगटोकमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने उतरले.

राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरुच राहणार आहे. प्रशासनासोबत झालेली त्यांची बैठक निष्फळ ठरली आहे. ऊस दरावरुन त्यांनी आंदोलन छेडले आहे.

मंत्रीपद देऊ न शकल्याने आमदारांना जास्त निधी दिला जातो- अंबादास दानवे

मंत्रीपद देऊ न शकल्याने आमदारांना जास्त निधी दिला जातो, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. सत्ताधारी आमदारांना ६५ टक्के निधी देण्यात आला आहे. मंत्रीपद न देण्यात आल्यास आमदारांना ३० कोटी रुपयांपर्यंत निधी दिला जातोय, असं ते म्हणाले आहेत.

माझा मुलगा मुख्यमंत्री बनेल असं कधीच वाटलं नव्हतं; मोहन यादव यांच्या वडिलांची प्रतिक्रिया

मला कधीच वाटलं नव्हतं माझा मुलगा मुख्यमंत्री बनेल. पण, ही सगळी माता आणि बाबा महाकाल यांची कृपा आहे, अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होणारे मोहन यादव यांचे वडील पूनम चंद यादव यांनी दिली आहे.

महुआ मोईत्रा यांची सुप्रीम कोर्टात धाव

तृणमूलच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी गिफ्ट घेतल्याचा आरोप त्यांच्यावर नीतीमत्ता समितीने केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या निर्णयाला त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.

एका साध्या कार्यकर्त्याला फक्त भाजपमध्येच मोठी जबाबदारी मिळू शकते- मोहन यादव

मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर भाजप नेते मोहन यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका साध्या कार्यकर्त्याला फक्त भाजपमध्येच मोठी जबाबदारी मिळू शकते, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी-शहांसह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशातील भाजपचा नवा मुख्यमंत्री ठरला आहे. भाजपने धक्कातंत्राचा वापर करत मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त केलं आहे. ते शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते.

आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर फडणवीसांचं वक्तव्य

आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. जम्मू-काश्मीरबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर फडणवीसांचं हे वक्तव्य केलंय. बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं, असं ते म्हणाले.

मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली

मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे धाराशिव दौऱ्यावर असून लोहरा तालुक्यातील माकणी येथे भाषण करता करता अचानक स्टेजवर बसले. यावेळी त्यांनी स्टेजवर बसून भाषण केलं आहे. त्यानंतर डॉक्टरांनी स्टेजवर त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्यामुळे जरांगे आता दौरा सोडून आराम करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यावर गोळीबार

अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. शहरातील मंठा चौफुली भागातील होंडा शोरूमसमोर गोळीबाराची घटना घडली. गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते. पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्या दिशेने गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे आक्रमक; इंग्रजी अक्षरातील पाट्या फोडल्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठी पाट्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. इंग्रजीत पाटी असलेल्या एका हॉटेलची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे.

नाशिक लोकसभा मदारसंघाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; खोडला ठाकरे गटाचा दावा 

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवार यांचं मोठं विधान केलं आहे. नाशिक लोकसभा मदारसंघाबाबत जागा ठाकरे गटाला सोडल्याच्या ठाकरे गटाचा दावा आज शरद पवारांनी खोडला आहे. महविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत मोठं विधान करत १९ तारखेला दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.

कांदा निर्यातीत हस्तक्षेप नसावा; सरकारच्या धोरणामुळे तुमच्या कष्टाला किंमत नाही- शरद पवार

शेतीच्या नकाशावरील अत्यंत महत्वाचा जिल्हा म्हणजे नाशिक आहे. द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन घेण्यात नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद होते. कांदा हे असे पीक ज्यात दोन पैसे मिळतात त्यासाठी तुम्ही कष्ट करतात. पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरविण्याचे अधिकार आहे त्यांना तुमच्या बद्दल कसलीच भावना नाही, त्यांना तुमच्या कष्टाची जाण नसेल तर त्यांचा उपयोग नाही, कांद्याच्या बाबतीत केंद्राने जो निर्णय घेतला त्यामुळे किमती कोसळल्या असं शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

LIVE Marathi News Updates : देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद - शरद पवार

देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान शरद पवारांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी मोदी सरकारच्या शेतकऱ्यांविषयी धोरणांवर टीका करताना केंद्र सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही, शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने कांदा निर्यातबंदी उठवलीच पाहिजे असे मत देखील शरद पवार यांनी व्यक्त केलं.

कलम ३७० वरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उद्धव ठाकरेंकडून स्वागत

उद्धव ठाकरे यांनी कलम ३७० बद्दल आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. २०१९ रोजी कलम काढण्यात आलं तेव्हाही सरकारच्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलं होतं, त्यानंतर आताही आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कांदाप्रश्नी शरद पवार रस्त्यावर; मुंबई-आग्रा महामार्गावर करणार रास्ता रोको आंदोलन

नाशिक - कांदा प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रानं कांद्यावर लादलेल्या निर्यातबंदी विरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड चौफुलीवर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. यासाठी शरद पवार आंदोसनस्थळी दाखल झाले आहेत.

निर्यातबंदीसह कांद्याबाबतच्या केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांचा निषेध करण्यासाठी आंदोलन होत असून या दरम्यान शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न पेटला आहे. कांद्याच्या निर्यातबंदीवरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुका घ्या - सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने आज जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरवला आहे. यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पूर्वी निवडणुका घ्या असेही निर्देष सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे योग्यच - सुप्रीम कोर्ट

जम्मू आणि काश्मीरची संविधान सभा संपल्यानंतर राष्ट्रपतींना कलम ३७० निष्प्रभ करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना होता. त्या वेळी संविधान सभा अस्तित्वात नसली तरीही, जम्मू आणि काश्मीरच्या संविधान सभेची शिफारस राष्ट्रपतींना कधीही बंधनकारक नव्हती. ते त्यांच्या विवेकबुद्धीनुसार कलम 370 काढून टाकण्याचा किंवा कायम ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींचा आदेश वैध मानला असून कलम ३७० हटवण्यासाठी राष्ट्रपतींच्या अधिकाराचा वापर करणे आम्ही चुकीचे मानत नाही असे कोर्टाने म्हटले आहे. देशाच्या राज्यघटनेतील सर्व तरतुदी जम्मू-काश्मीरला लागू केल्या जाऊ शकतात. हे कलम ३७०(१)डी अंतर्गत करता येते असेही कोर्टाने स्पष्ट केलं.

कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय वैध की अवैध? सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचणास सुरूवात

जम्मू आणि काश्मीर येथून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय वैध की अवैध? याबद्दलचा निकाल सर्वोच्च न्यायालयात वाचणास सुरूवात झाली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १६ दिवस सुनावणी पार पडली होती. आता लवकरच याबद्दलचा निर्णय सुनावला जाईल. या निकालाकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत - अजित पवार

पंचनामे झाल्याशिवाय शेतीच्या नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत. थोड्याच वेळात या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच कांद्यासंदर्भात काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो, यासोबतच आज किंवा उद्या केंद्रीय गृहमंत्री अजित पवार यांना देखील भेटणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

आदित्य, उद्धव ठाकरे आज होणार अधिवेशनात सहभागी

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्याच्या मुद्द्यावर राजकीय चर्चा रंगली. यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आज अधिवेशन कामकाजात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्या ठाकरे सहभागी होणार आहेत. आज सभागृहात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कलम 370 वर सर्वोच्च न्यायालय देणार निकाल! 

नवी दिल्ली : राज्यघटनेच्या कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या 2019 च्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात सलग 16 दिवस सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर मधील दगडफेक आणि इतर हिंसाचाराच्या घटना कशा कमी झाल्या याची आकडेवारीच कोर्टासमोर सरकारने सादर केली होती आज कोर्ट काय निर्णय देतं ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेना आमदार अमत्रतेची सुनावणी सुरूवात 

शिवसेना आमदार अमत्रतेची सुनावणी सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांची साक्ष घेण्याचं काम सुरु आहे. देवदत्त कामत हे उदय सामंतांची साक्ष घेत आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com