दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

रिपब्लिकन नेते मनोज संसारे यांचे निधन

भिवंडीत गोदामाला भीषण आग

ठाण्यातील भिवंडी परिसरात एका गोदामाला भीषण आग लागली. आग अजूनही सुरूच आहे, घटनास्थळी 6 अग्निशमन दल दाखल झाले आहेत.

इम्रान खान यांना सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्व प्रकरणाध्ये जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांना ९ मे पूर्वीच्या कोणत्याही प्रकरणात अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

उद्धव ठाकरे शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

उद्धव ठाकरे हे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी ते शिर्डीच्या साई मंदिरात दाखल झाले.

मविआला धक्का! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन मागे

परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळेत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

किशोर आवारे यांच्यावर तळेगावात प्राणघातक हल्ला

जनसेवा विकास समितीके अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर अज्ञातांकडून शुक्रवारी (ता.१२) पावनेदोनच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला आहे.जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारार्थ सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त आले होते.दरम्यान दबा धरून बसलेल्या अज्ञात शस्त्रधारी इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला हल्ला केला.

'द केरळ स्टोरी' वरील बंदी उठवा; सुप्रीम कोर्टात PIL दाखल

मल्टिप्लेक्समध्ये 'द केरळ स्टोरी' सिनेमा पाहण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकांना तातडीनं संरक्षण देण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात यावेत. तसेच हिंसाचार रोखण्यासाठीचं कारण देत ज्या राज्यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे ती उठवावी, असं जनहित याचिकेत म्हटलं आहे.

20 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

२० किंवा २१ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. तर या मंत्रीमंडळात त्यांना ही संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

16 आमदारच नव्हे, विधानसभा अध्यक्षही अपात्र होतील- अनिल परब

सुप्रिम कोर्टाच्या निकाला नंतर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. असं असलं तरी केवळ 16 आमदारच नव्हे तर विधानसभा अध्यक्षांवरही अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. अशी माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली.

सीबीएसईने 12वी बोर्डाचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आला.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यानं वाहनांच्या रांगा.

एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदाची निवडही कोर्टाने रद्द केली- अनिल परब

एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदाची निवडही कोर्टाने रद्द केली असल्याची माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितलं आहे.

राज्यामध्ये बेबंदशाही राबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार

गुरूवारी सुप्रिम कोर्टाने सत्तसंघर्षाचा निकाल दिला त्यानंतर राज्यात अनेक भिन्न प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेवून निकालावर सविस्तर बोलणार आहेत.

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com