Marathi News Update : दिवसभरातील राजकीय घडामोडी ते इतर अपडेट्स एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Update : दिवसभरातील राजकीय घडामोडी ते इतर अपडेट्स एका क्लिकवर...

जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

राष्ट्रवादीमध्ये पक्षविरोधी पक्षात आहेत. त्यामुळे अधिवेशनासाठी आसनव्यवस्था तशी करावी असे पत्र अध्यक्षांना दिल्याचं राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. अजून कोणी पक्ष सोडल्याचे सांगितले नाही, असं ते बोलताना म्हणाले.

१८ तारखेला शरद पवारांची भूमिका स्पष्ट होईल- प्रकाश आंबेडकर

अजित पवार आणि भाजपबरोबर गेले नेते परत यावे यासाठी ते काम करणार. त्यामुळे पवारांची भेट घेणे भेटणे स्वाभाविक आहे. विरोधी पक्षांची १८ तारखेला बैठक आहे. शरद पवार यांची भूमिका काय आहे त्याबाबत तेव्हा चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

मंत्री भेटून गेल्यानंतर शरद पवारांची बैठक सुरु

शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची बैठक सुरू झालेली असून मंत्री भेटून गेल्यावर आपसात चर्चा सुरु आहे.

पक्ष कसा एकत्रित राहील याचा विचार शरद पवारांनी करावा - प्रफुल पटेल 

पक्ष कसा एकत्रित राहील याचा विचार शरद पवारांनी करावा. आम्ही आजही शरद पवार यांचा आदर करतो. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. पक्ष एकसंघ राहावा यासाठी आम्ही विनंती केली, त्यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असंही प्रफुल पटेल म्हणाले आहेत.

आम्ही शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो - प्रफुल पटेल 

आम्ही शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. आम्ही वेळ न मागता आलो होतो. शरद पवार आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमच्या मनात शरद पवार यांच्याबाबत आजही आदर आहे.

अजित पवार आणि नेत्यांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक संपली

अजित पवार आणि नेत्यांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक संपली आहे. मात्र बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. ते याबाबतीत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुप्रिया सुळे यांचा जयंत पाटील यांना फोन

सुप्रिया सुळे यांचा जयंत पाटील यांना फोन करून वाय बी चव्हाण सेंटरवर बोलावण्यात आलं आहे, तर दुरीकडे अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी वाय. बी सेंटरवर दाखल झाले आहेत. छगन भुजबळ, तटकरे, अजित पवार, प्रफुल पटेल यांच्यासह इतर नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय. बी सेंटरवर दाखल झाले आहेत.

अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी वाय. बी सेंटरवर दाखल

अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी वाय. बी सेंटरवर दाखल झाले आहेत. छगन भुजबळ, तटकरे, अजित पवार, प्रफुल पटेल यांच्यासह इतर नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय. बी सेंटरवर दाखल झाले आहेत.

अजित पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली

अजित पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली आहे. आधिवेशनात कोणती भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे

मालाड मार्वे समुद्रात पाच मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश तीन बेपत्ता,शोध सुरू

मुंबईच्या मालाड मार्व समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या बारा ते पंधरा वर्षे वयोगटातील पाच मुले समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे बुडालेल्या पाच मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून तीन मुले अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचा काम सुरू आहे.

बस-ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 15 जण जखमी

हिंगोली जिल्ह्यातील नांदेड जिंतूर महामार्गावरील वगरवाडी गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसमधील दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींपैकी दोन ते तीन जण गंभीर असल्याची माहीतीही समोर येत आहे.

येत्या 4 दिवसात जुलैदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

येत्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. सोमवारी पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग आणि विदर्भातीस सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट आहे. तर, 18 आणि 19 जुलै रोजी पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही 17 जुलैपासून 19 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवगिरीवर महत्वाची बैठक

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवगिरीवर महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची देवगिरीवर बैठक बोलावली आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठकीच आयोजन करण्यात आलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com