Marathi News Update: उत्तरकाशीत बचाव कार्य थांबवण्यात आलं ते निवडणूक आयोगात सुनावणी, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स
Marathi News Live Update:
Marathi News Live Update:
Updated on

तांत्रिक बिघाडामुळे उत्तरकाशीत बचाव कार्य थांबवण्यात आले

उत्तरकाशीमधील सिल्क्यरा बोगद्याच्या एका भागात अडकलेल्या 41 कामगारांचे उत्तरकाशी बोगद्याचे बचाव कार्य तांत्रिक कारणामुळे पुन्हा थांबवण्यात आले आहे. बचाव पथकाला अडचणीचा सामना करावा लागला.

नाशिक दौरा अर्धवट सोडून बावनकुळे अहमदाबाद दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाबाबत आजची सुनावणी संपली

अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करताना कुठलीही निवडणूक पार पडली नाही - देवदत्त कामत

अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करताना कुठलीही निवडणूक पार पडलेली नाही. अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करताना नियम पाळले गेले नाहीत, असा दावा देवदत्त कामत यांनी केला.

ललित पाटीलला २९ तारखे पर्यंत न्यायालयीन कोठडी

ललित पाटीलचे सहकारी तपासाला सहकार्य करत नाही अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. ललित पाटीलला २९ तारखे पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

भूषण पाटील,अरविंद लोहारे ,हरीश पंत ,इम्रान शेख यांना २९ तारखे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली.

तर ललित पाटील,राहुल पंडित,शिवाजी शिंदे,झीशान शेख यांना २९ तारखे पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली.

इम्रान खानला नागपूर ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी फरार घोषित केलं होतं. अरविंद लोहारे आणि इतर लोक तपासात सहकार्य करत नाहीत. मोबाईल तपासातून काही गोष्टी उघडकीस आल्या असून यातील इम्रान शेख हा आरोपी नागपूरच्या गुन्ह्यात फरार होता हे तपासात समोर आलं आहे. 

मुंबई विमानतळावर बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देणाऱ्याला एटीएसने ताब्यात घेतलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची मेल द्वारे धमकी मिळाली होती. स्फोट टाळण्यासाठी 48 तासांत 10 लाख डॉलरची मागणी केली होती. बिटकॉइनमध्ये मागीतली होती खंडणीची रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम  होतील.

आदित्य ठाकरे 27 नोव्हेंबरला उत्तर प्रदेश दौऱ्यावर

27 नोव्हेंबरला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 27 नोव्हेंबरला मथुरेतील ठाकूर शामजी महाराज मंदिरातील सुशोभीकरणाचा शुभारंभ कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे उपस्थित राहणार. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त 27 नोव्हेंबरला मथुरेमध्ये भव्य कार्यक्रम होणार आहे. आदित्य ठाकरे यांचं शिवसैनिकांकडून भव्य स्वागत केलं जाणार आहे. 

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक 

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडणार आहे. ३० नोव्हेंबरला कर्जतमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व आमदार आणि खासदारांना उपस्थित राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

आजच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी शरद पवार उपस्थित राहणार नाहीत

आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही सुनावणीला उपस्थित असणार नाहीत. जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण हे नेते सुनावणीसाठी उपस्थित असणार आहेत.

राजस्थान दौऱ्यानंतर मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात जाणार प्रचाराला

राजस्थान दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणा राज्यात प्रचाराला जाणार आहेत. तेलंगना व महाराष्ट्राच्या सिमेवर राहणाऱ्या मराठी बहुभाषिक लोकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री भाजपचा प्रचार करणार आहेत. या पूर्वीच शिवसेनेने पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणात प्रचारासाठी जाणार आहेत.

PM मोदींनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवर केली चर्चा; बचावकार्याबाबत जाणून घेतली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवर चर्चा केली. बचाव कार्याबाबत माहिती घेतली. पंतप्रधानांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांची स्थिती आणि त्यांना पुरवल्या जाणार्‍या अन्न आणि दैनंदिन गोष्टींचीही माहिती घेतली. मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या जवानांची स्थिती आणि सुरक्षेबाबतही माहिती घेतली.

मराठी पाट्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिली शेवटची तारीख; उद्यापासून होणार दंडात्मक कारवाई

मराठी पाट्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने उद्याची शेवटची तारीख दिली आहे. दुकानावर उद्यापासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयाचे छगन भुजबळांना खडेबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाचे खडे बोल सुनावले आहेत. विनाकारण सुनावणी तहकूब करणार नाही अशा शब्दात मुंबई सत्र न्यायालयाने भुजबळांना सुनावले.

लोकप्रतिनिधींवरील खटले जलदगतीने मार्गी लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याचं देखील न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. मात्र अनेक खटल्यांच्या बाबतीत लोकप्रतिनिधींकडून वारंवार सुनावणी तहकुब करण्याची विनंती केली जाते. परंतु यापुढे असे घडणार नाही न्यायालयाने म्हटले आहे. विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळांना सुनावले खडे बोल सुनावले आहेत.

पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता

पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 3-4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय मुंबईतही 25 आणि 26 नोव्हेंबरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह इतर भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com