Update: दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Update: दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर
sakal

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची गोळ्या घालून हत्या

पोलिसांना खबर दिल्याच्या संशयावरुन गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथं एका २७ वर्षीय तरुणाची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. काल रात्री हा प्रकार घडला. तर हा तरुण पोलिसांचा खबऱ्या नव्हता, पण नक्षलवादी निरपराध आदिवासींना टार्गेट करत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. गडचिरोलीत सध्या पोलीस दलाकडून ऑपरेशन नलक्ष सुरु करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर ही घटना घडली.

सिलक्यारा बोगद्यातील कामगारांना बीएसएनलची साथ

बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना आता बीएसएनएलची साथ मिळाली आहे. कारण बोगद्यापर्यंत बीएसएनएलची लाईन पोहोचवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरुन सुरु आहे. कारण आतल्या कामगारांना घरी आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधता येईल.

पुणे मेट्रोच्या कामाची अजितदादांकडून पाहाणी!

डेंग्युच्या आजारातून बरे झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी आज पुणे मेट्रोच्या कामांची पाहाणी केली. काम कसं सुरु आहे, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

सिलक्यारा बोगद्यात अडकलेले 41 कामगार ख्रिसमसपूर्वी घरी परतणार - टनेल एक्सपर्ट

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगदा कोसळल्यानं त्यात ४१ कामगार गेल्या १४ दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यातच इथं बचाव पथकात काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञानं चार दिवसांपूर्वीच या कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं होतं. पण आता ख्रिसमसपर्यंत ते आपल्या घरी परततील अशी माहिती एका टनेल एक्सपर्टनं दिली आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगदा कोसळल्यानं त्यात ४१ कामगार गेल्या १४ दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यातच इथं बचाव पथकात काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञानं चार दिवसांपूर्वीच या कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं होतं. पण आता ख्रिसमसपर्यंत ते आपल्या घरी परततील अशी माहिती एका टनेल एक्सपर्टनं दिली आहे.उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगदा कोसळल्यानं त्यात ४१ कामगार गेल्या १४ दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यातच इथं बचाव पथकात काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञानं चार दिवसांपूर्वीच या कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं होतं. पण आता ख्रिसमसपर्यंत ते आपल्या घरी परततील अशी माहिती एका टनेल एक्सपर्टनं दिली आहे.उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगदा कोसळल्यानं त्यात ४१ कामगार गेल्या १४ दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यातच इथं बचाव पथकात काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञानं चार दिवसांपूर्वीच या कामगारांना लवकरच बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं होतं. पण आता ख्रिसमसपर्यंत ते आपल्या घरी परततील अशी माहिती एका टनेल एक्सपर्टनं दिली आहे.पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेप

दिल्लीतील साकेत न्यायालयाने २००८ मध्ये दिल्लीतील पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

राहुल गांधींचं नांदेड विमानतळावर आगमन, प्रचाराला होणार रवाना

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांचे शनिवारी नांदेड विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होती. त्यानंतर राहुल गांधी व अशोक चव्हाण दोघेही हेलिकॉप्टरने बोधन विधानसभा मतदारसंघासाठी रवाना झाले.

बोगद्याच्या आत तीन मजुरांची प्रकृती बिघडली

बोगद्याच्या आत तीन मजुरांची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी पाईपद्वारे आवश्यक औषधे दिली आहेत, तीन मजुरांनी डोकेदुखी, उलट्या, छातीत दुखत असल्याची तक्रार केली. काही कामगारांनी खाणे बंद केले, कामगार सकाळपासून जेवले नाही, कामगारांमध्ये तणावाचे वातावरण आहे, कामगार कुटुंबीयांशी बोलताना भावूक झाले, तातडीने तीन मानसोपचार तज्ज्ञांना घटनास्थळी पाठवण्यात आले ते आता कामगारांशी बोलतील.

भारतीय जनता पक्षाकडून निवडणुक आयोगात राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार

भारतीय जनता पक्षाकडून निवडणुक आयोगात राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपने निवडणूक आयोगाला पत्र लिहीत राहुल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. निवडणूक प्रचाराच्या सिमांचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने पत्रात केला आहे.

आयोगाच्या नियमानुसार प्रचाराच्या ४८ तासांच्या नियमांच राहुल गांधी यांच्याकडून उल्लंघन केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही तासांपूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करत राजस्थान मधील गहेलोत सरकारच्या काळातील कामांची माहिती दिली होती. त्यावर भाजपकडून आक्षेप घेतला आसून राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

राजस्थानमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २५ टक्के मतदान

राजस्थानमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २५ टक्के मतदान झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कराड दौरा रद्द; चर्चेला उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कराड दौऱ्यावर जाणार होते. मात्र, शिंदे यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.

'पूजा कोणीही केली तरी आम्हाला आशीर्वाद मिळेल', - अशोक गेहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपूरच्या सरदारपुरा विधानसभा मतदारसंघात मतदान केल्यानंतर म्हणाले की, आम्ही आत्तापर्यंत दिलेले शब्द, योजना सर्व गोष्टी पुर्ण केल्या आहेत. तर यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला वसुंधरा राजे यांनी मतदान करण्यापूर्वी पूजा केली, त्यावर गेहलोत म्हणाले, पूजा तर सर्वजण करतात मात्र सध्याचे वातावरण पाहता आमचे सरकार स्थापन होईल.

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी प्रमुख आरोपीसह दोघांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी

अंतरवली सराटी मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला त्यानंतर दगडफेकीची घटना समोर आली होती. दरम्यान, या प्रकरणी आरोपी ऋषिकेश बेदरेसह शनी सिरसट, कैलास सुरवसे यांना जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केली. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कुटुंबासह जोधपूरमध्ये केले मतदान

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सीएम अशोक गेहलोत यांच्यासह मतदान करण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा वैभव गेहलोत म्हणाला की, राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार आहे. इथल्या प्रथा बदलतील, त्यामुळे भाजप घाबरला आहे. लाल डायरीचा संदर्भ देत ते म्हणाले की, या सर्व बनावट गोष्टी आहेत. राजस्थानच्या प्रत्येक जागेवर काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. राजस्थान त्यांच्या हातातून गेल्याची जाणीव भाजपला झाली आहे.

नाशिक जिल्ह्यापाठोपाठ नगरमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलं

नाशिक जिल्ह्यापाठोपाठ आता अहमदनगरमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं आहे. निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये 9 वाजेपर्यंत 9.77 टक्के मतदान, बरानमध्ये सर्वाधिक मतदान

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. राजस्थानमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ९.७७ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान बाराण जिल्ह्यात झाले असून तेथे 12.97 टक्के मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान डुंगरपूर येथे झाले. येथे सकाळी ९ वाजेपर्यंत अवघे ६.७६ टक्के मतदान झाले.

चावरली गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला, पिंडवाडा मतदान केंद्र रिकामे

एकीकडे राजस्थानमध्ये लोक लोकशाही उत्सवात उत्साहाने सहभागी होत आहेत. दुसरीकडे पिंडवाडा येथील एका बूथवर मतदानावर बहिष्कार घातला जात आहे. चावरळी गावातील लोकांनी येथे मतदान केलेले नाही. ग्रामस्थांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. वास्तविक, चावरळी गाव बसंतगड पंचायतीला जोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत आहे.

पंतप्रधान मोदींचे राजस्थानच्या जनतेला मतदान करण्यासाठी आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या जनतेला विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, "राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. मी सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. या निमित्ताने काही लोक आज पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. माझे राज्यातील सर्व तरुण मित्रांना हार्दिक शुभेच्छा.

वसुंधरा राजे सिंधिया यांनी केले मतदान

राजस्थान भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. झालरापाटन विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजे यांनी झालावाड येथील केंद्रीय गृहनिर्माण मंडळातील मतदान केंद्र क्रमांक ३२ वर मतदान केले. मतदान केल्यानंतर वसुंधरा राजे सिंधिया यांनी राजस्थानच्या जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.

राजस्थानच्या 199 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू; 1,863 उमेदवार रिंगणात, भाजप-काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर'

राजस्थानमध्ये आज (शनिवार) म्हणजेच, 25 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या 199 जागांसाठी मतदान होत आहे. काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या निधनामुळं करणपूर विधानसभेची निवडणूक पुढं ढकलण्यात आली आहे. विधानसभेच्या 199 जागांसाठी 1 हजार 863 उमेदवार रिंगणात असून त्यांचं भवितव्य 5 कोटी 25 लाख 38 हजार 105 मतदार ठरवणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot), माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje), सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत (ईव्हीएम) बंद होणार आहे.


पाच राज्यातील निवडणुकीत राजस्थानमधील निवडणूक होत आहे. राज्यस्थानमध्ये १९९ जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी आजपर्यंत मुदत, नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com