Daily Updates: बोगद्यातून सुखरुप बाहेर आलेल्या मंजितच्या घरी दिवाळी; कुटुंबियांनी फोडले फटाके

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स...
Daily Updates: बोगद्यातून सुखरुप बाहेर आलेल्या मंजितच्या घरी दिवाळी; कुटुंबियांनी फोडले फटाके

बोगद्यातून सुखरुप बाहेर आलेल्या मंजितच्या घरी दिवाळी

उत्तर प्रदेशातील लखीमपुरी खिरी इथला रहिवासी असलेल्या मंजित या कामगाराच्या घरी आज दिवाळी साजरी करण्यात आली. कारण मंजित सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून आपल्या ४० सहकाऱ्यांसह अडकून पडला होता. तो आज सुखरुप बाहेर आला.

कामगार आपल्या पायावर चालत आले अजून काय पाहिजे - PMO

सिल्क्यारा बोगद्यात अडकलेले सर्वजण बाहेर आल्यानंतर पीएमओचे सल्लागार भास्कर खुल्बे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व ४१ कामगार बोगद्यातून आनंदान आपल्या पायानं चालत आले त्यामुळं यापेक्षा आनंदाचं वातावरण काय असू शकतं? असं त्यांनी म्हटलं आहे.

सिल्क्यारा बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्यात यश; १५ कामगार आले बाहेर

बोगद्यातून कामगारांना बाहेर काढायला आणखी ३-४ तास लागणार

उत्तरकाशीतल्या सिल्क्यारा बोगद्यातून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी ३ ते ४ तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन ऑथरिटीचे अधिकारी अटा हसनैन यांनी सांगितलं.

CM पुष्करसिंह धामी घटनास्थळावरुन रवाना

उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात उशीर होत असल्यानं त्यांच्यासाठी बोगद्याबाहेर थांबलेले मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी अखेर निघाले आहेत. अजूनही या बचाव कार्याला किती वेळ लागेल याबाबत नेमकं सांगता येणं कठीण आहे. सध्या बोगद्याबाहेर रुग्णवाहिकांचा ताफा, तात्पुरते दवाखाने उभारण्यात आले आहेत.

चंद्राबाबू नायडूंना सुप्रीम कोर्टाची नोटीस

कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आंध्र प्रदेश सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. या आव्हान याचिकेवरुन सुप्रीम कोर्टानं नायडू यांना नोटीस बजावली आहे.

राहुल गांधी 9 डिसेंबरपासून परदेश दौऱ्यावर  

काँग्रेस खासदार राहुल गांधी 9 डिसेंबरला परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. ते इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया आणि व्हिएतनामला भेट देणार आहेत. सिंगापूर आणि मलेशियामध्ये ते भारतीय डायस्पोरांना भेटतील. इंडोनेशियामध्ये, ते राजकीय नेत्यांना भेटणार आहेत, तसेच व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता आहे

बोगद्यात निघाले NDRF जवान

सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजूरांपर्यंतचे खोदकाम पूर्ण झालं आहे. आता हळू-हळू एनडीआरएफचे जवान आतमध्ये जात आहेत. आतमध्ये पोहोचल्यानंतर हे जवान मजूरांना स्ट्रेचरवर झोपवणार आहेत. त्यानंतर चाकं असलेल्या स्ट्रेचरच्या माध्यमातून मजूरांना बाहेर पाठवण्यात येईल.

उत्तरकाशी बोगद्यात रुग्णवाहिका दाखल

बोगद्याच्या आत रुग्णवाहिका नेली जात आहे. ताज्या अपडेटनुसार, 55.3 मीटरपर्यंत पाईप टाकण्यात आले आहेत. बोगद्यात अडकेल्या कामगारांना आज बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे.

अजून दोन-तीन मीटर अंतर बाकी; उत्तरकाशी बोगद्यात अडकेलेल्या कामगारांची सुटका आजच?

उत्तरकाशी (उत्तराखंड) बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आहेत. यादरम्यान बोगदा तज्ञ ख्रिस कूपर यांनी बचावकार्याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "...आम्ही अजूनही खाणकाम करत आहोत. आम्हाला अजून दोन मीटर्स जायचे आहेत... आम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काहीतरी हाती लागण्याची अपेक्षा करत आहोत. 2-3 मीटर बाकी आहेत..."

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - धनंजय मुंडे

"राज्यातील सुमारे 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली असल्याचे वृत्त आहे; तसेच आणखी पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी व गारपीटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस व त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे." - धनंजय मुंडे, कृषीमंत्री

पुण्यात भुजबळांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित १३३ वा महात्मा फुले स्मृतीदिन व समता दिन तसेच महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. महात्मा फुले वाड्यात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते यावर्षीच विचारवंत लेखक संपादक संजय आवटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

PM नरेंद्र मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक; कामांचा घेतला जाणार आढावा

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. पीएम मोदींकडून आपापल्या खात्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. 31 डिसेंबर पूर्वी आपापल्या मंत्रालयाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत केल्या जाणार आहेत.

सरकारने ग्रामीण भागासाठी राबवलेल्या सुविधा आणि गरीब कल्याण योजना यांचाही आढावा घेतला जाणार असून आगामी मिशन 2024 बाबत पंतप्रधान संवाद साधणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमूळ मागच्या महिनाभरापासून केंद्राची महत्वाची बैठक झाली नव्हती.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून मॅरेथॉन सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मॅरेथॉन सुनावणी होणार आहे. आजपासून सलग पाच दिवस ही सुनावणी होईल. यामध्ये सलग तीन दिवस आमदार सुनील प्रभू यांची उलट साक्ष होणार आहे. अॅड महेश जेठमलानी ३ दिवस उलट साक्ष घेणार आहेत. व्हीप बाबत कार्यालयीन कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे.

अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय तरुणीने संपवलं जीवन

मुंबई : अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय महिलेने कथितरित्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी महिला आयएनएस हमला येथे प्रशिक्षण घेत होती. मालवणी पोलिसांनी ADR ची नोंद केली आणि पुढील कारवाई करत आहेत.

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज पुन्हा विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. मागील आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे.

नागपुरात हवामान विभागाकडून येलो अलर्ट, सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू

नागपूर शहरामध्ये काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे पारा काही अंशांनी खाली घसरला आहे. आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे.. उद्या नंतर तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच नागपूर जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट दिला आहे.

ड्रग्ज माफीया ललित पाटीलची बडदास्त ठेवणाऱ्या ससूनमधील एकाला अटक

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महिंद्र शेवतेला पोलिसांनी अटक केली आहे. शेवते हा कारागृहातून ससून रुग्णालयात आणलेल्या कैद्यांची बडदास्त करत होता. शिवतेला अटक केल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयात असताना ललित पाटीलची सगळी कामे शेवते बघत असल्याची माहिती समोर आली आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com