दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

School Trips
School Tripsesakal

पुण्यातील एका शाळेतील तब्बल ६० विद्यार्थ्यांना विषबाधा

पुण्यातील राजगुरूनगर येथील एका शाळेतील ६० मुलांना विषबाधा झाली आहे. या साठ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मुलांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात येणार अमित शहा...

कसबा पेठ निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार असल्याची माहिती आहे. १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी अमित शाह पुण्यात येणार आहेत.

जम्मू-काश्मीरमधील १२ जिल्ह्यांना हिमस्खलनाचा इशारा

जम्मू-काश्मीरमधील १२ जिल्ह्यांना हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देखील सरकारने दिला आहे.

निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्पावर लोकसभेत देतील उत्तर

निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्पावर लोकसभेत देतील उत्तर देण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता.

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकची धडक, ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

छत्तीसगड राज्यात कांकेर जिल्ह्यातील कोरार गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थी आणि ऑटोचालक जखमी आहेत. जखमी विद्यार्थ्यांना कोरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, महानिरीक्षक बस्तर पी सुंदरराज यांनी या अपघाताची माहिती दिली.

तुर्की-सीरियामध्ये मृतांचा आकडा १६,०००च्यावर, आणखी शोध सुरू...

तुर्कस्तान-सीरियातील भूकंपातील मृतांचा आकडा १६,०००च्या पुढे गेला आहे. आणखी मृतदेहांचा शोध सुरु आहे. त्यामुळे मृतांची संख्या देखील वाढू शकते.

विरोधकांच खात बंद केलय म्हणून वेदना होतायत

फक्त भावना व्यक्त केल्या म्हणजे सगळं काही झालं अस होत नाही. समस्यांना विरोधकांनी प्राधान्य दिलं. कमळ फुलवण्यात विरोधकांचे योगदान.

विकास करण्यासाठी इच्छाशक्ती लागते. न थकता आम्ही देशासाठी काम केलं. आधी योजना अडकत होत्या आता अठवड्याभरात तयार होतात.

सरकारमध्ये आलेला कोणीही देशासाठी काहीतरी करण्याचे आश्वासन देतो, पण केवळ भावना व्यक्त करून फायदा होत नाही. त्यामुळेच विकासाचा वेग, लक्ष्य काय, परिणाम काय, हे फार महत्त्वाचे होते.

राज्यसभेत PM मोदींच्या भाषणावेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत. मात्र, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. यावेळी मोदी यांनी जितकं चिखल फेकाल तितकं कमळ चांगले फुलेले. असे उत्तर दिले.

ठाणेकरांना गिफ्ट; CM शिंदेंनी कोपरी पुलाचं केलं उद्घाटन

ठाणे-मुंबईला जोडणारा कोपरी पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे एमएमआरडीए आज तो लोकांसाठी खुला देखील करणार आहे. या पुलामुळे ठाणेकरांची वाहतुक कोंडीत सुटका होणार आहे.

..तर मी आमदारकीचा राजीनामा देईन - हसन मुश्रीफ

कोल्हापूर : माझी बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. माझ्‍याविरोधातील एकही आरोप खरा ठरला तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असं रोखठोक मत ट्विटव्दारे व्हिडिओ शेअर करत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (Kolhapur Central Cooperative Bank) बदनाम करण्याचं पाप करू नका, असंही ते म्हणाले.

RSS प्रमुख मोहन भागवतांना नक्षलवादी-आयएसआयची धमकी

भागलपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) उद्या 10 फेब्रुवारीला भागलपूरला येणार आहेत. दरम्यान, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) आणि नक्षलवादी संघटनांनी (Naxalite Organization) मोहन भागवत यांना धमकी दिलीये. त्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालंय.

NSE च्या माजी प्रमुखांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

दिल्ली उच्च न्यायालयानं आज (गुरुवार) एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Former NSE Chief Chitra Ramkrishna) यांना फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. चित्रा रामकृष्ण यांच्यावर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (National Stock Exchange) कर्मचार्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी याबाबतचा निकाल दिलाय. एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालकांना यापूर्वी एनएसई घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं अटक केली होती. त्यांना ईडीनं या प्रकरणात गेल्या वर्षी 14 जुलैला अटक केली होती.

आंध्र प्रदेशमध्ये टॅंकर साफ करताना श्वास गुदमरुन सात कामगारांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील रागमपेटा गावात एक मोठी घटना घडली आहे. येथील खाद्यतेल उत्पादक कंपनीत टँकर साफ करताना सात कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना दिल्या शुभेच्छा; म्हणाले...

आज काही आव्हान देणार नाही. वाढदिवसानिमित्त आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो. आमची सवय आहे की, आम्ही कुणाचेही वाईट बघत नाही. आमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसले असतील, पाठीत वार केले असतील तरी देखील आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही. नेहमी आमच्याच शुभेच्छा सर्वांसोबत असतात. असं आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

बाळासाहेब दाभेकर यांनी अर्ज घेतला मागे

काँग्रेसमध्ये बंडखोरी करत बाळासाहेब दाभेकर यांनी मंगळवारी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना आता हा अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. दाभेकर यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

हेमंत रासने 'सत्या'साठी लढणार; सुधीर मुनगंटीवार

पुण्यात पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपकडून ओंकारेश्वर मंदिरात आरती करुन भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या निवडणुकीचा शुभारंभ झाला आहे. या प्रचारासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. हेमंत रासने हे सत्तेसाठी नाहीतर सत्य आणि विकासासाठी लढणार आहे, असा विश्वास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

बुलेट ट्रेनला हायकोर्टाचा हिरवा कंदील

बुलेट ट्रेनला हायकोर्टाचा हिरवा कंदील दाखवाला आहे. गोदरेजची याचिका फेटाळुन लावली आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात नारळ फोडून हेमंत रासने यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावली आहे.

राज्यात कायद्याच्याबाबतीत अनागोंदी सुरुय

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात कायद्याच्याबाबतील अनागोंदी सुरु आहे. असा दावा केला आहे. राज्यात अनेक हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्र्यांनी वेळीच पावलं उचलावीत. शिवसैनिक मिंदे गटासोबत गेले नाहीत जाणारदेखील नाहीत.
विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले असते तर चित्र वेगळं असतं. सत्ताधाऱ्यांनी अध्यक्षपदाची निवडणुक लांबवली त्याचा फटक आता बसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे जुने सहकारी आहे. त्यांनी आम्हाला साथ दिली आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

उस्मानाबादमध्ये उरुसात चेंगराचेंगरी, १४ भाविक जखमी

उस्मानाबादमधील उरुसात वळू उधळल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये १४ भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. सविस्तर वृत्त....

'अनस्टॉपेबल सीएम'; शिंदेंच्या वाढदिवसाचं टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकलं बॅनर

अमेरिकेत जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर झळकवत काही तरुणांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला. वाचा सविस्तर.....

उपमुख्यमंत्र्यांनी CM शिंदेना भेट देत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक संदर्भात काही अपडेट्स येतील. पुण्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वादावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हिंडेनबर्ग प्रकरण अदानी समुहा अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. तुर्कीत झालेल्या भूकंपात आतापर्यंत११ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.