

Maharashtra Local Body Elections
sakal
Maharashtra Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाचं उल्लंघन झाल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार स्थानिक निवडणुका वेळेत होणार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. या निर्णयामुळे आगामी जिल्हा परिषद नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.