Supreme Court Verdict
esakal
Maharashtra Local Body Elections: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण या निवडणुकीत काही ठिकाणी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्याविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सगळ्याचं राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. अशावेळी सर्वोच्च न्यायालयात नेमका काय निर्णय होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.