Lok Sabha Voting: अमरावती, वर्ध्यासह काही ठिकाणी EVMमध्ये तांत्रिक बिघाड; मतदार ताटकळले, केंद्रांवर लांब रांगा

Lok Sabha Voting: सकाळच्या सुमारास मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी केली. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले
Lok Sabha Voting
Lok Sabha VotingEsakal

Lok Sabha Voting: महाराष्ट्र राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी केली.

मतदानावेळी कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले.

अमरावती, अकोला, नांदेड आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

नांदेडमध्ये सुमारे दीड तासांपासून मतदान यंत्र बंद असल्याची माहिती मिळत आहे. सावरगाव निपाणी या गावामधील हा प्रकार आहे. यामुळे सध्या मतदान प्रक्रिया थांबल्याचं समजत आहे. साम टीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

Lok Sabha Voting
Ajit Pawar: अजित पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा; त्या वक्तव्याप्रकरणी दिली क्लिन चीट

वर्ध्याच्या देवळी येथे EVM मशीन बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली आहे. मशीनच बंद पडल्यामुळे कोणीही मतदान करू शकलेलं नाही. अखेर, अधिकाऱ्यांनी मशीन पुन्हा सुरू केल्यानंतर मतदानास देखील सुरुवात झाली आहे.

अमरावतीच्या वडरपुरा भागातील मतदान केंद्रावर देखील EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर येत आहे. सुमारे 15 मिनिटे ही मशीन बंद होती. यानंतर अधिकाऱ्यांनी मशीन सुरू केली.

Lok Sabha Voting
Sangli Loksabha election 2024 : सांगलीच्या जागेबाबत सोनिया गांधींनाच उत्सुकता; नाना पटोलेंनी सांगितला किस्सा

महाराष्ट्रातील ८ लोकसभा जागांसाठी आज मतदान

बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे.

Lok Sabha Voting
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचं आश्वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com