
देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात आश्चर्यकारक इतिहास रचला आहे. राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन शनिवारी संपले आहे. मात्र मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या ३९ मंत्र्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, याची माहिती नव्हती. शपथ घेऊन 7 दिवस उलटले तरी मंत्री त्यांच्या खात्याची वाट पाहत होते. मात्र आता महायुतीचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाले आहे.