Latest Marathi News Live Update
esakal
कन्नड नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद आणि २५ नगरसेवक निवडून देण्यासाठी १२ प्रभागांमधून मतदान घेण्यात आले. शहरातील ४३ मतदान केंद्रांवर मंगळवारी (ता.२) ३७ हजार ७८० पैकी २९ हजार ०२७ मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७६.८३ टक्के मतदान नोंदले गेले. यामध्ये १४ हजार ९१५ पुरुष आणि १४ हजार १०८ महिला मतदारांचा समावेश होता.