Latest Marathi News Live Update
esakal
छत्रपती संभाजीनगर येथील बनावट आयएएस महिला कल्पना भागवत हिने हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही गंडविले आहे. ‘आयएएस’च्या मुलाखतीसाठी जाते, वडिलांचे निधन झाले अशी विविध कारणे देत तिने एक लाख ४५ हजार रुपये त्यांच्याकडून घेतले.
कल्पना हिच्या बँक खात्यावर ३२.६८ लाख रुपये जमा झाल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी आता ज्या लोकांनी पैसे पाठविले त्यांची चौकशी करण्याची तयारी चालवली आहे.